चोरट्यांचा कहरच! त्यासाठी त्यांनी फोडल्या चक्क वाहनांच्या काचा

0
359

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी वाहनांच्या काचा फोडून साहित्य सोडून नेले. या घटना सोमवारी (दि. 26) संत तुकाराम नगर आणि शेवाळे सेंटर जवळ पिंपरी येथे उघडकीस आल्या.

पहिली घटना संत तुकाराम नगर, पिंपरी येथे उघडकीस आली. याबाबत सिद्धेश्वर नारायणदास रेपाळ (वय 30) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी त्यांची कार रविवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कारच्या काचा फोडून 55 हजार रुपयांचा टच स्क्रीन चोरून नेला.

दुसरी घटना शेवाळे सेंटर जवळ चौधरी यांच्या दुकानासमोर उघडकीस झाली. या प्रकरणात सुनील दगडू कसबे (वय 21, रा. शेवाळे सेंटर शेजारी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल (पूर्ण नाव माहिती नाही), प्रसाद (पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फिर्यादी यांच्या घरा शेजारी राहतात. आरोपींनी दौलत चौधरी यांच्या मालकीचा छोटा हाथी टेम्पोच्या काचा फोडून टेम्पो मधून चार हजार रुपये किमतीचा कारटेप चोरून नेला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.