चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीमध्ये स्फोट; पाच कामगार जखमी

0
759

मुंबई, दि. ८ (पीसीबी) –  चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांन्टमध्ये आज (बुधवार) दुपारी ३ वाजता बॉयलरचा झालेल्या मोठ्या स्फोटात चार ते पाच कामगार जखमी झाले. तर आणखी काही कामगार आतमध्ये अडकल्याचे सांगतिले जात आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगावासह चार पाच किलोमीटरचा परिसर या स्फोटाने हादरला. अग्निशमन दलाच्या पंधरा गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  

बीपीसीएलचा अग्निशमन विभाग आणि मुंबई अग्निशमन दल ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. या रिफायनरी प्लान्टच्या बाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे. या झोपडपट्टीतल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. माहुलमध्ये भारत पेट्रोलियमचे मोठे रिफायनरी प्लांन्टस आहेत.

स्फोट झालेल्या ठिकाणी नेमकी किती जिवीतहानी झाली ते अद्याप समजू शकलेले नाही. पण काही कामगार आग लागलेल्या ठिकाणी अडकले आहेत अशी माहिती शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी दिली. बीपीसीएलच्या हायड्रोक्रॅकर प्लानंटमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. त्या बाजूला आणखी एका प्लांन्ट आहे. या परिसरात मोठया प्रमाणावर तेल टाक्या असून ही आग पसरण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान आहे.