चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली ही अभिनेत्री अन्….

0
1004

मुंबई, दि.९ (पीसीबी) – ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नुशरत भरुचा सध्या तिच्या आगामी ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती आयुषमान खुरानासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत नुशरतने तिच्यासोबत घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नुशरतने तिला आलेला विचित्र व हास्यास्पद अनुभव सांगितला. ”मी एकदा चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेले होते. पण बरं झालं की आत कोणीच नव्हतं. मी लगेचच धावत बाहेर आले. बरं झालं त्यावेळी आत कोणी नव्हतं आणि बाहेरूनही कोणी आत आलं नाही. नाहीतर सर्वांसमोर माझी फजिती झाली असती.”