चुकून घराचा दरवाजा उघड राहिला आणि चोरांनी भर दुपारी…

0
236

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ९५ हजारांचे ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ९ डिसेंबर रोजी दुपारी तीन ते साडेपाच वाजताच्या सुमारास डोळस चाळ, भोसरी येथे घडली.

दीपाली योगेश डोळस (वय ३७, रा. डोळस चाळ, भोसरी) यांनी याबाबत रविवारी (दि १३) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटामध्ये ठेवलेले ज्वेलर्सची पर्स आणि त्यातील ४८ ग्रॅम वजनाचे ९५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.