Maharashtra

चुकीचे मेसेज आणि अफवा पसरवल्यास संबंधितांवर होणार कडक कारवाई

By PCB Author

March 31, 2020

 

मुंबई, दि.३१ (पीसीबी) – सध्या महाराष्ट्र आणि देशात करोनाचे संकट आहे. त्यामुळे चुकीचे मेसेज आणि अफवा पसरवल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

देशमुख म्हणाले, आज ३१ मार्च आणि उद्या १ एप्रिल म्हणजेच ‘एप्रिल फूल’चा दिवस. पण तुम्हाला माहिती आहे की, आज संपूर्ण देश, महाराष्ट्र करोनशी झुंजत आहे. त्यामुळे अशा वेळी वातावरण बिघडेल असे चुकीचे मेसेज किंवा अफावा पसरवू नका. अशा प्रकारे जर कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला किंवा वातावरण खऱाब करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सायबर क्राईमच्या अंतर्गत कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे, त्यांनी सरकाला सहकार्य करावे.

@MaharashtraCyber1's unit has registered 36 FIRs across the state against those spreading fake news about #CoronavirusOutbreak on social media. As #HomeMinister I've ordered that all such guilty persons should be booked swiftly.#WarOnCorona#WarOnFakeNews

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 29, 2020