Desh

चीनमध्ये २०१५ पासूनच कोरोनावर सुरु होते संशोधन; जैविक शस्त्रांचा वापर करुन मोठा संहार करण्यासाठी तयारी

By PCB Author

May 10, 2021

बीजिंग,दि.१०(पीसीबी) -कोरोना या संसर्गजन्य आजाराला कारणीभूत असलेला कोविड१९ विषाणू हे चीनचे जैविक शस्त्र आहे. या विषाणूवर चीनमध्ये अनेक वर्षांपासून संशोधन सुरू होते. चीनला कोरोनाच्या विषाणूच्या संशोधनात पहिले मोठे यश २०१५ मध्ये मिळाले. यानंतर प्रयोगशाळेत या विषाणूला आणखी सक्षम करण्यात आले आणि तो माणसांच्या शरीरात पोहोचावा याची काळजी घेतली गेली. चीन तिसऱ्या महायुद्धात जैविक शस्त्रांचा वापर करुन मोठा संहार करण्यासाठी तयारी करत आहे. या तयारीचा एक भाग म्हणून चीनच्या प्रयोगशाळेत कोविड१९ या विषाणूला आणखी सक्षम करण्यात आले.

कोरोना संदर्भातील ताजी धक्कादायक माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या एका अहवालात स्पष्ट नमूद असल्याचे वृत्त इंग्लंडच्या ‘द सन’ आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे. चीनच्या संशोधकांनी कोविड१९ विषाणूचा शोध लावल्यानंतर चिनी सैन्याच्या लष्करी उच्चाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले होते. या पत्रात कोविड१९ विषाणू बाबत बरीच माहिती नमूद आहे.

चीनचा उद्देश कोविड१९ विषाणूच्या माध्यमातून जगातील जास्तीत जास्त देशांच्या आरोग्य यंत्रणेवर ताण टाकणे तसेच जास्तीत जास्त देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडवणे हा आहे. तिसऱ्या महायुद्धाचा एक भाग म्हणून चीन कोविड१९ विषाणूचा एका जैविक शस्त्रासारखा वापर करत आहे; असेही अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या एका अहवालात स्पष्ट नमूद असल्याचे वृत्त इंग्लंडच्या ‘द सन’ आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे.