Videsh

चीनची कमाल! बनवली सिंगल चार्जमध्ये ५० वर्षे पावर देणारी बॅटरी

By PCB Author

January 17, 2024

चीननं एक मोठी कामगिरी केली आहे, त्यामुळे स्मार्टफोनच्या विश्वात मोठा बदल होऊ शकतो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का तुमच्या फोनची बॅटरी सिंगल चार्जमध्ये ५० वर्षांपर्यंत चालू शकते? हे ऐकायला एखाद्या चित्रपटातील टेक्नॉलॉजी वाटते. परंतु हे सत्यात अवतरला आहे. सध्या चीननं एक खास बॅटरी बनवली आहे, जी मोबाइल फोन आणि ड्रोनमध्ये वापरता येईल. ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये सुमारे ५० वर्षांपर्यंत चालेल.

नाण्याच्या आकाराची असेल बॅटरी

The Independent च्या रिपोर्टनुसार बीजिंग आधारित Betavolt नं एक न्यूक्लियर बॅटरी बनवली आहे. ही बॅटरी खास आहे, कारण साधरणतः न्यूक्लियर बॅटरी खूप मोठी असते. परंतु Betavolt नं बनवलेली न्यूक्लियर बॅटरी एका नाण्याच्या आकाराची आहे, जी कोणत्याही स्मार्टफोनमध्ये लावली जाऊ शकते. त्यामुळे आगामी काळात स्मार्टफोन खूप लाइटवेट आणि खूप स्लिम असू शकते. ही पहली बॅटरी असेल, जी अ‍ॅटॉमिक एनर्जी (अणुशक्ती) वर चालेल.

फीचर्स काय असतील

पुढील जनरेशनची बॅटरी चीनमध्ये टेस्ट करण्यात आली आहे आणि लवकरच कॉमर्शियल प्रोडक्ट जसे की फोन आणि ड्रोनसाठी न्यूक्लियर बॅटरीचे प्रोडक्शन सुरु होईल. या बॅटरीचा वापर एअरोस्पेस, एआय डिव्हाइस, मेडिकल डिव्हाइस आणि मायक्रोफोनसह अ‍ॅडवांस्ड सेन्सर आणि छोटे ड्रोन आणि मायक्रो रोबोटमध्ये केला जाईल. एक्सपर्टनुसार, या नवीन बॅटरीमुळे चीन जागतिक स्थरावर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सर्वांना मागे टाकू शकतं.

बॅटरीचा खरा आकार १५ x १५ x ५ मिलीमीटर इतकाच आहे. ही बॅटरी ३ वॉटवर १०० मायक्रोवॉट पावर जनरेट करेल. वर्ष २०२५ पर्यंत हीच पावर आउटपुट १ वॉट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. Betavolt कंपनीचा दावा आहे की या बॅटरीच्या रेडिएशनचा माणसाच्या शरीरावर कोणताही दुष्परिमाण होणार नाही. हिच्या मदतीनं पेसमेकर सारखे मेडिकल डिवाइस बनवता येतील. या बॅटरीला आग लागण्याची किंवा स्फोट होण्याची शक्यता कमी आहे. ही बॅटरी ऋण ६० पासून १२० डिग्री सेल्सियस तापमानावर देखील काम करेल.