Desh

चीनकडून ५,७०० कोटींचे कर्ज घेणारे कोण ? – संजय सिंग

By PCB Author

June 29, 2020

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – चीनकडून ५,७०० कोटी रुपये घेणारे केंद्रातील भाजप सरकारच दुसरीकडे शेजारी राष्ट्राकडन आयात होणाऱ्या मालावर बहिष्कार टाकायची भाषा करते, अशी टीका आप चे नेते संजय सिग यांनी केली आहे. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

संजय सिंग म्हणतात, हा मोठा मजेशीर प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांचेच सरकार चीन कडूनन ५.७०० कोटींचे कर्ज घेते आणि दुसऱ्या बाजुला देशातील दनतेला चीनच्या मालावर बहिष्कार टाकाला सांगता, हा दुटप्पीपणा आहे. सिमेवरती जवान हकनाक आपले प्राण देत आहेत आणि भाजप सरकार दुसऱ्या बाजुने समावेशक धोरणावर काम करते आहे.

बिजिंगमधील बहुउददेशिय अशी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आणि आपले सरकार यांच्यात जून २०१९ मध्ये एक करार झाल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्या अंतर्गत ७५० मिलियन डॉलर (सुमारे ५६८८ कोटी रुपये) कोव्हिड साठी मदत दिली आहे, असे सिंग यांनी म्हटले आहे. या निधीतून कोव्हिड मध्ये बाधित गरिबांवर उपचार होणार आहेत.