चीनकडून पाकिस्तानला जाणारी हवाई वाहतूक बंद

0
583

इस्लमाबाद, दि. १ (पीसीबी) – चीनने पाकिस्तानमधून ये-जा कऱणारी हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत विमानांना पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश कऱण्यासही मनाई करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अनेक देशांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवास न करण्याचा निर्णय घेतल्याने युरोप आणि दक्षिण पूर्व आशियातील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.

आखाती देशांमधील अनेक विमाने पाकिस्तान आणि पाकिस्तान-भारत सीमारेषेवरुन उड्डाणे करतात. या सर्व विमानांना चीनला जाण्यासाठी मार्ग बदलावा लागत असून भारत, म्यानमार किंवा मध्य आशियाच्या हवाई हद्दीतून प्रवास करावा लागत आहे अशी माहिती एका वृत्त्वाहिनीला दिली आहे.

बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळाने बुधवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून ये-जा करणाऱ्या विमानांची वाहतूक बंद केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून दर आठवड्याला पाकिस्तानातून २२ विमाने उड्डाण करतात.

सीमारेषेवर तणाव वाढल्याने गुरुवारी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी आपली महत्त्वाची विमानतळे बंद केली होती. या विमानतळांवरुन प्रवाशी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. भारताने काही वेळाने विमानतळे सुरु केली होती, मात्र पाकिस्तानने संध्याकाळपर्यंत विमानतळे बंद ठेवली होती.