Desh

चिदंबरम येणार तिहारमधून बाहेर; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

By PCB Author

December 04, 2019

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन दिला आहे. चिदंबरम सध्या तिहार तुरूंगात आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना यापूर्वीच जामीन दिलेला आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे.