Maharashtra

चिथावणीखोर विधानाप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

By PCB Author

April 28, 2019

औरंगाबाद, दि. २८ (पीसीबी) – फेसबुक अकाऊंटवर चिथावणीखोर व्हीडिओ टाकणे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या व्हिडीओतील चिथावणीखोर विधानाप्रकरणी  जाधव यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये जाधव यांनी एका पक्षाचे कार्यालय तोडण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. या व्हिडीओची  गंभीर दखल घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जाधव यांनी एका पक्षाबद्दल आक्षेपार्ह  विधान केल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि शांतता भंग होऊ शकते, असा आरोप त्यांच्यावर  ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, एका अल्पवयीन मुलाने महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यासंदर्भात जाधवांनी हा व्हीडिओ फेसबुकवर टाकला होता.  जाधव यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.