Bhosari

चिखली घरकुल येथे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

May 14, 2019

चिखली, दि. १४ (पीसीबी) – इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळाफास घेत आत्महत्या केली. ही घटना चिखलीतील घरकुल येथे घडली.

ऋषिकेश विठ्ठल सुवर्णकार (वय १९, रा. घरकुल, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ऋषिकेशने आत्महत्या का केली हे अद्याप समजु शकले नाही. चिखली पोलीस तपास करत आहेत.