चिखली, कृष्णानगर येथे ४ लाखांची घरफोडी

0
383

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने, रोकड असा चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना चिखली, कृष्णानगर येथील ब्ल्यू बेल सोसायटीत शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

इम्तियाज बहाउद्दीन शेख (वय ४८, रा.   ) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेख यांच्या घराला कुलुप लावले होते. यावेळी चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. घरातील ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख रूपयांची रोकड असा ३ लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार बागूल करत आहेत.