Bhosari

चिखलीमधील बंद कंपनीत घुसून २ लाखांच्या तांब्याच्या वायरी अज्ञात चोरट्यांनी पळवल्या

By PCB Author

October 05, 2018

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – बंद असलेल्या कंपनीमध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख रुपयांच्या तांब्याच्या वायरी चोरून नेल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवार (दि.२) ते बुधवार (दि.३) दरम्यान चिखली कुदळवाडी येथील सती एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीत घडली.

याप्रकरणी प्रमोद प्रसाद गुप्ता (वय ४४, रा नक्षत्र फेज-१, जी-२०४, पुर्णानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चिखली कुदळवाडी येथे सती एंटरप्रायझेस नावाची कंपनी आहे. मंगळवार (दि.२) ते बुधवार (दि.३) दरम्यान कंपनी बंद असताना अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून कंपनीत प्रवेश केला. तसेच कंपनीत ठेवलेले २ लाख रुपये किमतीचे तांब्याच्या वायरी चोरुन नेल्या. निगडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.