Bhosari

चिखलीत सहा वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे

By PCB Author

March 01, 2019

चिखली, दि. १ (पीसीबी) – एका सहा वर्षीय चिमुकलीसोबत ४५ वर्षीय नराधमाने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २६) सायंकाळी आठच्या सुमारास चिखली येथे घडली.

याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने चिखली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार,  सचिन सर्जेराव काळोखे (वय ४५, रा. नेवाळे वस्ती, चिखली) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सहा वर्षीय मुलगी मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास ट्युशनवरून घरी येत होती. सोसायटीतील इमारतीच्या लिफ्टमधून घरी येत असताना लिफ्टजवळ थांबलेल्या आरोपी सचिन काळोखे याने तिच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग केला.  चिमुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. यावर तिच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सचिन विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.