चिखलीत वर्कशॉपमधील साहित्याची चोरी

0
604

चिखली, दि. ७ (पीसीबी) – वर्कशॉपचे शटर उचकटून अज्ञात चोरटयांनी दुकानातील ७४ हजारांचे साहित्य चोरुन नेले. ही चोरी बुधवारी (दि.५) सकाळी साडेनऊच्या सुमारास चिखली परिसरातील ‘अंजली टी प्रिसिजन’या वर्कशॉपमधून उघडकीस आली.

याप्रकरणी वर्कशॉपचे मालक सचिन नारायण घोरपडे (वय ४०, रा. स्पाईनरोड, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घोरपडे यांचे चिखली परिसरात ‘अंजली टी प्रिसिजन’ या नावाने वर्कशॉप आहे. मंगळवारी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वर्कशॉपचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानातील ७४ हजार रुपये किमतीचे ‘शाप्ट मटेरियल’ चोरून नेले. बुधवारी सकाळी फिर्यादी घोरपडे दुकानात आले असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.