चिखलीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; दोनदा केला गर्भपात

0
763

चिखली, दि. १९ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने २८ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केला. तसेच त्या तरुणीचा दोनवेळा गर्भपात देखील केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डिसेंबर २०१७ ते २५ मे २०१९ या दरम्यान चिंचोली, देहुगाव, मोरेवस्ती आणि चिखली येथे घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दगडु तुकाराम कांबळे (रा. ओटास्किम निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१७ ते २५ मे २०१९ या दरम्यान पीडित तरुणीला आरोपी दगडु याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी चिंचोली, देहुगाव, मोरेवस्ती आणि चिखली येथे नेऊन बलात्कार केला. यामुळे तरुणी दोनदा गर्भवती राहिली होती. मात्र आरोपी दगडुने तिचा दोन्ही वेळा गर्भपात केला. आरोपी दगडु याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत तपास करत आहेत.