Bhosari

चिखलीत मित्राच्याच डोक्यात दगड घालून खून

By PCB Author

May 16, 2019

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास चिखली शरदनगर येथे घडली.

सनी मोहन घाटोळकर (वय १९, रा. हरगुडे वस्ती, स्पाईन रोड, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पोलिसांना सोन्या उर्फ प्रतीक सुरेश मोरे (रा. शरदनगर, चिखली) याच्यावर संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सनी आणि सोन्या हे दारु पिऊन चिखलीतील शरदनगर परिसरातून येत होते. यादरम्यान त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. आणि सोन्याने सनीच्या डोक्यात दगड घालून खून केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनेनंतर सोन्या फरार आहे. चिखली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.