चिखलीत पाचजणांना लोखंडी रॉडने जबर मारहाण; महिलाही जखमी

0
1214

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तीन जणांच्या टोळक्यांनी चिखली येथे जावून पाचजणांना लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेमध्ये एक महिला देखील जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (दि.१३) जाधववाडी, चिखली येथे घडली.

योगेश संतोष इंगळे (वय १९) मित्र गौरव पंडितराव साळुंखे (वय २०), अमोल रतनराव साळुंखे (वय २१), ऋषिकेश बाळू मांडेरे (वय २०) आणि अमोल याची आई अंजू साळुंखे असे मारहाण झालेल्या पाच जणांची नावे आहेत. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुभम ईश्‍वर तायडे (वय १९), शुभम देवानंद प्रधान (वय २२), महेश बाळू लगाडे (वय २२, तिघेही रा. जाधववाडी, चिखली) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आरोपी आणि जखमींची पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी चिखली येथे जावून योगेश इंगळे यांचे मित्र गौरव साळुंखे, अमोल साळुंखे, ऋषिकेश मांडेरे आणि अमोल याची आई अंजू साळुंखे यांना लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करत आहेत.