चिखलीत पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून करण्याचा प्रयत्न; पतीस अटक

0
448

चिखली, दि.२० (पीसीबी) – घरगुती भांडणाच्या कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कदायक घटना बुधवार दि.१९ रात्री पावणे अकराच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.

जयश्री सुरेश गोसावी (वय २५, रा.गोकुळ सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) असे चाकूचे वार होऊन जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पती विजय पुंडलिक गोसावी( वय २८ मतराला ,ता.पानसेलम, बडवाने, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

जयश्री आणि विजय हे पती- पत्नी आहेत. त्यांच्यामध्ये नेहमी घरगुती कारणावरून भांडण व्हायचे. बुधवारी याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. आणि विजयने त्याच्या जवळील चाकुने जयश्रीच्या गळ्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. पोलीसांनी विजयला अटक केले आहे. तर जखमी जयश्रीवर रूग्णालयात उपचार सरू आहेत. पोलिस उपनिरीक्षक घुगे अधिक तपास करत आहे.