चिखलीत दारु पिण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ

0
429

चिखली, दि. २२ (पीसीबी) – रिक्षा घेण्यासाठी तसेच दारू पिण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली पोलीस ठाणे हद्दीत नोव्हेंबर २०१४ ते एप्रलि २०१९ दरम्यान घडली.

याप्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार, पती सुहास सुरेश बोराटे (वय ३१) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा घेण्यासाठी व दारू पिण्यासह रोजच्या खचार्साठी आरोपी सुहास याने २९ वर्षीय पत्नीकडे नोव्हेंबर २०१४ ते एप्रलि २०१९ या कालावधीत माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. मात्र, विवाहितेने माहेराहून पैसे न आणल्याने सुहासने विवाहितेला वारंवार शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने चिखली पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पतीवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहे.