चिखलीत ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

0
397

चिखली, दि. १२ (पीसीबी) – भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत २२ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि.१०) सायंकाळी सातच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.

सुनिल भागवत शिंदे (वय २२, रा. चिखली) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय भागवत शिंदे (वय ३४, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात ट्रकचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास सुनिल हा चिखलीतील आंगणवाडी कॉलनीतील देशी दारुच्या दुकानासमोरुन पायी चालला होता. यावेळी (एमएच/०३/सीव्ही/१९९९) या ट्रकवरील चालकाने सुनिल याला जोरदार धडक दिली. यामध्ये सुनिला याचा मृत्यू झाला. ट्रकचालक सध्या फरार असून चिखली पोलिस त्याचा शोध घेत आहेत.