Bhosari

चिखलीत जबरदस्तीने लग्न लावून विवाहितेचा पैशांसाठी छळ

By PCB Author

March 04, 2019

चिखली, दि. ४ (पीसीबी) – शरीर संबंध ठेवण्यास असक्षम असल्याचे माहित असताना देखील सासरकडच्या मंडळींनी तरुणाचे २६ वर्षीय तरुणीसोबत लग्न लावून दिले. त्यानंतर तिचा छळ करुन माहेरहून मशरुमचा व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये अशी धमकी देऊन शारिरिक आणि माणसिक त्रास दिला. ही घटना नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१९ दरम्यान साने चौक चिखली येथील सोसायटीत घडली.

याप्रकरणी पिडित २६ वर्षीय महिलेने सासरकडच्या मंडळींविरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पती जयेश बाळकृष्ण फडतरे, सासू निर्मला बाळकृष्ण फडतरे, सासरे बाळकृष्ण फडतरे, सदाशिव शिंदे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणीचे जयेशसोबत २०१७ मध्ये लग्न झाले होते. सासरकडच्या मंडळींना जयेश हा शरीर संबंध ठेवण्यात सक्षम नसल्याचे माहित असताना देखील या तरुणीला फसवून तिचे लग्न लावण्यात आले. यानंतर फडतरे कुटुंबाने किरकोळ कारणावरुन तिचा छळ करण्यास सुरुवात करुन त्रास दिला. तसेच मशरुमचा व्यावसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता, सासरच्या मंडळींनी पिडितेला पुन्हा त्रास दिला. याप्रकरणी सासरकडच्या मंडळींविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ओमासे अधिक तपास करत आहेत.