चिखलीत घरफोडी; नऊ तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास

0
798

चिखली, दि. ७ (पीसीबी) –  कुलुप लावून बंद असलेल्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रोख चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.६) पहाटे चारच्या सुमारास समोर आली.

याप्रकरणी दत्तात्रय लालासाहेब निंबाळकर (वय ४१, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निंबाळकर यांचे सासरे हे पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे बुधवारी (दि.५) निंबाळकर कुटुंबीय घराला कुलुप लावून त्यांना पाहण्यासाठी पुण्याला गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी निंबाळकर यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले एकूण नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम १५ हजार चोरुन नेले. चिखली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.