Bhosari

चिखलीतील १७ वर्षीय मुलाचा पोहताना खाणीत बुडून मृत्यू

By PCB Author

May 04, 2019

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – मित्रासोबत खाणीत पोहायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना आज सकाळी (शनिवार) अकरा वाजण्याच्या सुमारास यश आले.

गौतम सुधीर निष्ठूर (वय १७, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम शुक्रवारी (दि.३) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत चाकणजवळील  मोई येथील दगडाच्या खाणीत पोहायला गेला होता.

यावेळी पोहताना गौतम पाण्यात बुडाला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी याची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात गौतमचा शोध सुरू केला. मात्र, त्याचा मृतदेह काही हाती लागला नाही. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले. जवानांनी पाणबुडीच्या साहाय्याने गौतमचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.