Bhosari

चिखलीतील शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप

By PCB Author

September 24, 2018

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – चिखली येथील शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी (रविवारी) गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे दोन ते अडीच हजार गणेश भक्तांनी आपली उपस्थिती नोंदवली होती.

चिखली येथील शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश मंडळ गेल्या बारा वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी चिखली परिससरातील गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे, या उपक्रमात मंडळातील कार्यकत्यांबरोबरच महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो.

दरम्यान, गणेश उत्सव सुरू झाल्यापासूनच कार्यकत्यांच्या वतीने घरोघरी जाऊन महाप्रसादाचे निमंत्रण दिले जाते. शिवाय गणेश मंडळाची वर्गणी गोळा करत असताना आवर्जून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे निमंत्रण दिले जाते. गेल्या बारावर्षापासून खंड न पडता हा उपक्रम राबविला जात आहे, अशी माहिती शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक गिताराम मोरे यांनी दिली.