Bhosari

चिखलीतील रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी सोडवा – दिनेश यादव

By PCB Author

December 27, 2018

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – चिखली भागातील विविध रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी सोडवावी, अशी मागणी प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पोलिस उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “ चिखली भागात नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या भागातून नोकरीच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. तळवडे आयटी पार्क, चाकण, निघोजे, मोई याठिकाणी नोकरी निमित्ताने नागरिक चिखली कुदळवाडी भागातून जात असतात. यामुळे रात्रीच्या वेळी आणि सकाळी वाहतूककोंडी होत असते. तसेच चिखली चौक, कुदळवाडी चौक, मोईफाटा चौक या भागातील वाहतूक नियंत्रक दिवे चालू करण्यात यावे. वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यात यावी व वाहतूक सुरुळीत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”