Bhosari

चिखलीतील मोरया कंपनीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन तीन कामगार जखमी; एक गंभीर

By PCB Author

June 23, 2019

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – चिखलीतील मोरया डाय कास्टर या कंपनी नायट्रोजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने तीन कामगार जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी (दि.२२) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.

राहुल गौंड (वय २५ रा. हरगुडे वस्ती, कुदळवाडी) असे गंभीर जखमी कामगाराचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मोरया कंपनीत डाय बनवण्याचे काम चालते. शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास काम सुरु असताना अचानक नायट्रोजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये तीन कामगार किरकोळ जखमी असून राहूल यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चिखली अग्निशामक केंद्र, संत तुकारामनगर अग्निशामक केंद्राचे जवान आणि चिखली पोलिसांनी आग अटोक्यात आणून मदत कार्य केले.