चिखलीतील घरकुल प्रकल्पात भारतीय संविधानाबाबत विचारवंतांकडून प्रबोधन

0
583

भोसरी, दि. १ (पीसीबी) – भारतीय संविधानामुळे समाजात आमूलाग्र बदल झाला. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व सामाजिक न्यायाची पेरणी झाली, असे मत विचारवंत व लोणावळा कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. जीभाऊ बच्छाव यांनी व्यक्त केले.

सम्यक क्रांती संघ, फेडरेशन ऑफ घरकुल, घरकुल प्रतिष्ठान आणि नागरिकांच्या वतीने चिखलीतील घरकुल प्रकल्पात संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत विचारवंत डॉ. जीभाऊ बच्छाव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्धयान महासंघाचे भन्ते राजरतन होते.

भन्ते राजरतन यांनी संविधानामुळे वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र जोडले गेल्याचे सांगितले. सर्वजित बनसोडे यांनी भारतीय लोकशाहीसमोरील वेगवेगळी आव्हाने या विषयावर व्याख्यान दिले. दत्तात्रय घाडगे यांनी संविधा प्रास्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमासाठी भगवान पाटे, सुरेश आठवले, दगडू जोगदंड, भागवत सोनकांबळे, उदय बागूल, दिलीप तवाने, प्रभाकर वरनारायण, राहुल निरगुड, लक्ष्मण वाघमारे, देवानंद लिंबारे, सतीश पवळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास बेळसांगवीकर यांनी केले. बाळासाहेब चंदनशिवे यांनी आभार मानले.