Maharashtra

चिंता करू नका, ‘अभी तो मैं जवान हू’ – शरद पवार  

By PCB Author

October 05, 2019

कोल्हापूर,  दि. ५ (पीसीबी) – राज्यातून शिवसेना-भाजपचे सरकार घालवण्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.  अभी तो मैं जवान हू,  चिंता करण्याचे कारण नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. 

शरद पवार  राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे  उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना  सरकारवर  जोरदार हल्लाबोल चढवला. महाराष्ट्राने मला खूप दिले आहे. आता चुकीच्या लोकांच्या हातात गेलेला महाराष्ट्र पुन्हा योग्य माणसांच्या हातात देण्यासाठी माझी धडपड सुरु आहे, असे ते यावेळी म्हणाले.

शरद पवार म्हणाले की,  ए वाय पाटील असो,  के पी पाटील असो,  सतेज पाटील असो ही सगळी मंडळी मनापासून कामाला लागली आहेत. त्याचा मला आनंद आहे. पण त्यांची एक गोष्ट मला आवडली नाही. तिघांनाही सांगतो, असे बोलू नका.  ते म्हणाले ८० वर्षांचा माणूस,  आता मी काय म्हातारा झालोय? या राज्यातून शिवसेना-भाजपचे सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.  त्यासाठी अभी तो मैं जवान हूं. चिंता करण्याचे कारण नाही,  असे शरद पवार म्हणताच  सभेत एकच  हास्यकल्लोळ  झाला.