Chinchwad

चिंचवड स्टेशन येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना अटक

By PCB Author

October 31, 2018

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – चिंचवड स्टेशन येथील शॉपअॅक्ट कार्यालयाजवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी आठ जणांना अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.२९) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.

बाळासाहेब लिंगशेट्टी पाटील, वासू नागाप्पा नायक, व्यंक्टेश तिंपप्पा लावरे, रविराज विलास रसाळ, जावेद बुडन खान, बसवराज शंकर आसादे, विश्वनाथ अमिनाप्पा भोई आणि उमर इब्राहिम शेख असे जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी चिंचवड पोलीसांना माहिती मिळाली कि, चिंचवड स्टेशन येथील शॉपअॅक्ट कार्यालयाजवळ जुगार अड्डा सुरु आहे. यावर रात्री आठच्या सुमारास पोलीसांनी त्या ठिकाणी सापळा रचून धाड टाकली असता वरील आठ आरोपी जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच जुगार अड्ड्यावरुन ८०० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य आणि काही रोख रक्कम जप्त केली आहे.