चिंचवड स्टेशनजवळ भरधाव कारने दोन कारला धडक देऊन तिघांना उडवले  

0
828

चिंचवड, दि. (पीसीबी) – चिंचवड स्टेशनजवळील कुणाल प्लाझा इमारतीसमोरील रस्त्यावर भरधाव कारने दोन वाहनांना धडक देऊन रस्त्याने चालत जाणाऱ्या तिघांना उडवले. ही घटना आज (गुरूवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने कुणाल प्लाझा इमारतीसमोरील रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या दोन कारला जोराची धडक दिली. तसेच रस्त्याने पायी जाणाऱ्या तिघांना उडवले.

अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.