चिंचवड येथे शिक्षण संस्था चालवणाऱ्या महिलेला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याने चौघांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा

0
793

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – चिंचवड येथे शिक्षण संस्था चालवणाऱ्या महिलेला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपींवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल झाल्यानतंर चिंचवड पोलीसांनी दाखल केला.

याप्रकरणी ४० वर्षीय पिडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमनाथ यादव थरकुडे (वय ४०), छाया रोहीदास सावंत, योगीता सोमनाथ थरकुडे, बायडाबाई किसन सावंत (सर्व रा. जोबो वसाहत, चिंचवडेनगर, चिंचवड) या चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चिंचवड येथे एक शैक्षणीक संस्था आहे. ती संस्था चालविण्यावरून आरोपी व फिर्यादीमध्ये वाद होता. आरोपी हे फिर्यादीला ‘तू ही संस्था चालवू शकत नाही’ असा वाद घालत होते. फिर्यादी यांच्या शाळेत कार्यक्रम सुरु असताना आरोपी तेथे गेले आणि त्यांनी फिर्यादी यांना केस धरून मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. यावरून चौघांवरही अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमनाथ याच्यावर विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीतेने जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर चिचंवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.