चिंचवड येथे ट्रकच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू

0
720

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात इसमाला भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१४) सकाळी साडेअकराच्या सुमारास चिंचवड येथील महावीर चौकात घडली.

मयत इसमाचे अंदाजे वय ३० वर्ष असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र पोलीसांनी ट्रक चालक लक्ष्मण यल्लाप्पा मोन (वय ४५, रा. गुडलक दुकानाच्या मागे, पडवळनगर १६ नंबर) याला ट्रकसह अटक केली असून त्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ३० वर्षीय अज्ञात इसम चिंचवड येथील महावीर चौकातून रस्ता ओलांडत होता. यावेळी आरोपी लक्ष्मण यल्लाप्पा मोन याने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच/१४/एफ/८५९१) भरधाव वेघाने चालवून त्या इसमाला चिरडले. यामध्ये त्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. या इसमाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. ट्रक चालक मोन याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल कामठे तपास करत आहेत.