चिंचवड येथे घरासमोर पार्क केलेली कार चोरीला

0
510

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेली १ लाख २० हजार रुपये किमतीची इंडिका विस्टा कार चोरट्याने डुप्लीकेट चावीच्या सहाय्याने चोरुन नेली. ही घटना ११ जून ते १२ जून दरम्यान गुरुद्वारा चौकाजवळ, साई विवाह हौसिंग सोसायटी, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी रियाज शौकत शेख (वय ३६, रा. गुरुद्वारा चौकाजवळ, साई विवाह हौसिंग सोसायटी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रियाज शेख यांनी त्यांची १ लाख २० हजार रुपये किमतीची इंडिका विस्टा कार (क्र.एमएच/१२/केएन/४५७५) ही ११ जून ते १२ जून दरम्यान ते राहत असलेल्या घरासमोर पार्क करुन ठेवली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने डुप्लीकेट चावीच्या सहाय्याने ती कार चोरुन नेली. चिंचवड पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.