चिंचवड येथून दोघा अल्पवयीन चोरट्यांना अटक; पाच दुचाक्या आणि तीन लॅपटॉप जप्त

0
676

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – पाच दुचाक्या आणि तीन लॅपटॉप असा एकूण २ लाख ४० हजारांच्या ऐवजासह पिंपरी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई चिंचवड मोहननगर परिसरातील मिल्कमेड कंपनीसमोर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिसांचे एक पथक रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांचा तपास घेण्यासाठी चिंचवड मोहननगर परिसरातील मिल्कमेड कंपनीसमोर गस्त घालत होते. यावेळी त्यांना एका दुचाकीवर दोन अल्पवयीन तरुण संशयितरित्या फिरत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी  पाच दुचाक्या आणि तीन लॅपटॉप असा एकूण २ लाख ४० हजारांच्या ऐवज चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी तो ऐवज जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, महादेव जावळे, श्रीकांत जाधव, अजिनाथ सरक, जावेद बागसिराज, प्रतिभा मुळे, अविनाश देशमुख, उमेश वानखडे, रोहित पिंजरकर यांच्या पथकाने केली.