Chinchwad

चिंचवड येथून तरुण २५ दिवसांपासून बेपत्ता

By PCB Author

May 22, 2019

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – काशिदनगर पिंपळे गुरव येथे राहणारा एक तरुण चिंचवड परिसरातून गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता आहे.

कैलास नेमाराम चौधरी (रा. काशिदनगर पिंपळे गुरव) असे या बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कैलास बाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरीत सांगवी पोलीस ठाणे किंवा ९९२१४९१५९४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.