चिंचवड येथील ४ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ चिंचवड पोलीस ठाण्यावर मोर्चा; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

0
769

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – चिंचवड येथील ४ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आज (बुधवार) बिजलीनगर परिसरातील नागरिकांनी तसेच अत्याचार झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी चिंचवड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजन माउली सूर्यवंशी, बिजलीनगर परिसरातील नागरिक, अत्याचार झालेल्या मुलीचे कुटुंबीय तसेच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल काटे, राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते फजल शेख उपस्थित होते. तर उपस्थितांनी चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांच्याकडे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.