चिंचवड येथील श्री अग्रसेन भवनचे शनिवारी कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उद्घाटन होणार

0
799

चिंचवड , दि. १९ (पीसीबी) – चिंचवड येथे बनविण्यात आलेल्या पहिला भव्य व बहुमजल्यांचे श्री अग्रसेन भवन अग्रवाल समाजाच्या एकताचा एक आदर्श आहे. पिंपरी चिंचवड परिसरात अग्रवाल समाज गेल्या 30 वषापासून राहत आहे. परंतु समाजाचे स्वत:चे असे एकही भवन नव्हते, या उद्देशास पुर्ण करण्याचे कार्य श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवड-प्राधिकारणच्या वतीने करण्यात आले आहे. पुणे- मुंबई रोड, चिंचवड येथे भव्य श्री अग्रसेन भवनचे निर्माण केले आहे. ज्याचे उदघाटन २३ मार्च रोजी होणार आहे.

सकाळी साडे दहा वाजता वास्तुशांति, मूर्ति स्थापना, पूजा व हवनचे आयोजन केले आहे. तसेच संध्याकाळी सहा वाजता उदघाटन समारंभ, आरती व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि विविध लोकांचे सम्मान करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य पाच मजल्याच्या श्री अग्रसेन भवनचे लोकार्पण अग्रवाल समाज फेडरेशन पुणे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लोकापर्ण संमारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा रुबल अग्रवाल उपस्थित राहणार असल्याचे श्री अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवीचंद बंसल यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे सचिव कृष्णलाल बंसल, खजिनदार जोगिंदर मित्तल, भवन निर्माण अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, भवन निर्माण सहअध्यक्ष विनोद बंसल, भवन निर्माण सदस्य सुनिल अग्रवाल उपस्थित होते.

श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवड-प्राधिकारणच्यावतीने नव निर्मित श्री अग्रसेन भवन संदर्भात अधिक माहिती देत, अध्यक्ष सुभाष बंसल म्हणाले की, हे भवन चार मजल्याचे बनविण्यात आले आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर कॉसमॉस बँक आहे. दुसऱ्या मजल्यावर पाच हजार चौरस फुटाचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य एसी हॉल बनविण्यात आला आहे. तिसऱ्या मजल्यावर अत्याधुनिक एक हजार फुटात किचन आणि भोजन व्यवस्थेसाठी चार हजार चौरस फुटाची जागा उपलब्ध आहे. चौथ्या मजल्यावर श्री अग्रसेन ट्रस्टचे सुसज्ज कार्यालय आणि कॉन्फ्रेंस हॉल व पैंट्री आहे. तसेच चौथ्या मजल्यावर वर-वधु आणि पाहुण्यासाठी चार सुसज्ज ए.सी. खोल्या आहेत. तसेच एक मोठा मल्टीपर्पज हॉलचे निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे भवनात आठ व्यक्ती क्षमताच्या दोन लिफ्ट जनरेटर बैकअप सोबत उपलब्ध आहे. आपली सामाजिक जवाबदारी पार पाडत ट्रस्टच्यावतीने गरजू लोकांच्या उपचारासाठी श्री अग्रसेन हॉस्पिटलचे देखील निर्माण केले आहे.”