चिंचवड येथील महावीर चौकात ट्रॅफिक सिग्नलचा खांब कोसळला

0
564

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात असलेला ट्रॅफिक सिग्नलचा खांब आज (बुधवार) पहाटे चारच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

मात्र बराच वेळ हा खांब चालू रस्त्यात पडल्याने वाहतुकीला काहीसा आढथळा निर्माण झाला होता. वाहतुक पोलीस खांब हटवण्याचे काम करत आहे.