चिंचवड येथील गरवारे कंपनीमध्ये ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा

0
596

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – चिंचवड येथील गरवारे टेक्निकल फायबर  या कंपनीमध्ये  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबावा व प्रत्येकाने आपल्या मनामध्ये पर्यावरण रक्षणाचा ध्यास घ्यावा,  या उद्देशाने दरवर्षी कंपनीमध्ये हा दिवस वृक्षारोपणाने व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो.

पर्यावरण रक्षणाच्या बॅचेसचे वाटप करण्यात आले. यानंतर पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.   याप्रसंगी कंपनीचे चेअरमन  वायूसाहेब यांनी गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपची भेट घेऊन सर्वाना मार्गदर्शन केले. प्रत्येकांनी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करून पर्यावरण संवर्धनासाठी आपलाही हातभार लावावा, असा मोलाचा संदेश यावेळी  वायूसाहेबांनी दिला. तसेच सगळ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा देऊन  रोपांचे वाटप केले. शाम कुंभार यांनी ‌गरवारे निसर्गप्रेमी ग्रुप करीत असलेल्या विविध निसर्गसंवर्धन व सामाजिक उपक्रमांची माहिती  दिली.

‌यानंतर गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपने दिघी, दत्तगड  येथे जाऊन वृक्षारोपण केले. आज लावलेल्या प्रत्येक झाडाचे,आम्ही पालकत्व घेऊन त्याचे संगोपन करू अशी ग्वाही दिली.

या उपक्रमाचे नियोजन शाम कुंभार यांनी केले.  तर संघटनेचे अध्यक्ष जयवंत खाटपे  व निसर्ग प्रेमी ग्रुपचे अन्य सदस्य, संजय पाटील,शेखर गाडे, संजू खोत, रमेश दातीर, सतीश तारू, विलास पाटील,  श्रीराम ठाकरे, मल्लाप्पा बिरादार, काळूराम कुंभार, नंदकुमार पालांडे , राजीव साठे व आरुष पाटील यांनी सहभाग घेतला.

‌व्यवस्थापन अधिकारी प्रबोध कामत, विलास आरेकर, निशांत जाधव, अरविंद जाधव, सुधीर अडसूळ यांनी मोलाचे सहकार्य केले.