Chinchwad

चिंचवड मधील विद्यार्थ्याने मिळवला जागतिक पुरस्कार

By PCB Author

March 20, 2024

जगभरातील ३७ देशांमधील निवडलेल्या फक्त २२ विद्यार्थ्यांमध्ये चिंचवडच्या तेजस काळेचा समावेश झाला आहे. त्याला नुकताच दुबई येथे सी एक्स ओ २.५ या संस्थेद्वारा यंग लीडरशिप अवॉर्ड मिळाला आहे. अवघे 22 वर्षे वय असणाऱ्या या विद्यार्थ्यांची आत्तापर्यंत दोन इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाय तो नासाच्या सिटीजन सायंटिस्ट या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट आहे. तो सध्या आकुर्डीच्या डी वाय पाटील कॉलेजमध्ये शिकत आहे.

अगदी सर्वसामान्य घराच्या परिस्थितीमध्ये वाढलेल्या आणि आई गृहिणी वडील वाहतूक व्यवसायिक असणाऱ्या तेजसला संशोधनाची कसलीही पार्श्वभूमी नाही. तरी तो त्याच्याच वयाच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र विषयाच्या कार्यशाळा घेऊन शिकवत आहे. आतापर्यंत या विषयात त्याने २५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे

महत्त्वाचे म्हणजे त्याने स्वतःची firm अर्थात कंपनी स्थापन केली आहे त्याचे वाचन अफाट आहे. खगोलशास्त्राच्या जाणीव जागृतीसाठी त्याने चर्चा तीन दिवसीय कार्यशाळा एका वर्षात सहा कॉलेजमध्ये घेतले आहेत.अगदी पहिलीपासूनच त्याला या विषयाची गोडी लागली आहे. वरील संस्थेद्वारा त्याचा प्रकल्प फायनल टप्प्यात आहे जर तो निवडला गेला तर त्याला सहा लाखाचे अनुदान मिळू शकते.