Chinchwad

चिंचवड  मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By PCB Author

October 20, 2019

चिंचवड, दि. २० (पीसीबी) –  चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी २ हजार ७०० अधिकारी आणि  कर्मचारी यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड मतदारसंघात एकूण  ४९१ मतदान केंद्रे आहेत. येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२१) मतदान होणार आहे.

या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाचे तिसरे प्रशिक्षण व मार्गदर्शन आज (रविवार)  करण्यात आले.  यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ, राजेश आगळे, शिरीष पोरेड्डी आदी उपस्थित होते.

चिंचवड मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. तर २ लाख ७६ हजार ९२७ पुरूष आणि २ लाख ४१ हजार ९८० महिला आणि इतर ३२ असे एकूण ५ लाख१८ हजार ३०९ मतदार आहेत. तर ४९५ दिव्यांग मतदार तर १७१ सैनिक मतदार आहेत. ४९१ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ३३ मतदान केंद्राचे स्थलांतर केले आहे. ४९१ कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट तयार ठेवण्यात आली आहेत. ९८ कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि ५० व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आली आहेत.