चिंचवड पोलीस चौकीसमोर गोंधळ घालत मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

0
611

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – आपसातील वादातून तिघाजणांनी चिंचवड पोलीस चौकीसमोरच एकमेकांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याने या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष मुरलीधर केंगले यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय विलास गायकवाड (वय ३२, रा. २१६, मंगळवार पेठ, शिवाजी आखाड्यासमोर, पुणे), सागर पंढरीनाथ धुमाळ (वय ३२, रा. रुपाली कॉर्नर, जुना जकातनाका, चिंचवड) आणि राजश्री सागर धुमाळ (वय ३१, रा. २१६, मंगळवार पेठ, शिवाजी आखाड्यासमोर, पुणे) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी विजय, सागर आणि राजश्री या तिघांनी अपसातील वादातून चिंचवड पोलीस चौकीसमोरच एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याने चिंचवड पोलीस चौकीतील पोलीस शिपाई संतोष केंगले यांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या तिघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे तपास करत आहेत.