चिंचवड पोलीसांनी २६/११ हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रध्दांजली

0
599

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करताना वीरमरण आलेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, मेजर संदीप उनीकृष्णन यांच्यासह इतर शहीदांना चिंचवड पोलीसांच्या वतीने आज (सोमवार) श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आज २६/११ हल्ल्याला दहा वर्ष पुर्ण झाली आहेत. त्या निमित्त चिंचवड पोलीसांनी श्रध्दांजली सभेचे आयोजन केले होते.