Chinchwad

चिंचवडमध्ये ४३ जीवंत काडतुसे सापडल्याने खळबळ

By PCB Author

November 23, 2018

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीजवळील ब्रीजखाली असलेल्या रेल्वे ट्रकवर एका पिशवीत तब्बल ४३ जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी ती जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीजवळील ब्रीजखाली एक कचरा वेचक महिला रेल्वे ट्रकच्या कडेकडेणी कचरा वेचत होती. यावेळी त्या महिलेला एका लाल रंगाच्या पिशवीत काडतुसे आढळून आली. घाबरलेल्या महिलेने त्वरीत पिंपरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तातडीने घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी पिशवी तपासली असता त्यामध्ये तब्बल ४३ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन तपासणी केली असता त्या काडतुसांवर Made in Belgiun आणि Western Super no 12 Made in USA असे लिहिलेले आढळून आले. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.