चिंचवडमध्ये स्पाईस जेट विमान कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणीला ४६ हजारांचा गंडा

0
463

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पुणे विमान तळावर स्पाईस जेट या विमान कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणीला ४६ हजारांचा गंडा घालण्यात आला. ही घटना २२ एप्रिल ते २ मे २०१९ दरम्यान चिंचवड काळभोरनगर येथील एश्वर्यम व्हेंचर्स बी २०२ येथे घडली.

याप्रकरणी स्वस्ती पवन चतुर्वेदी (वय २२, रा. चिंचवड, काळभोरनगर, एश्वर्यम व्हेंचर्स बी २०२) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, करण नावाच्या एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण याचे काळभोरनगर, एश्वर्यम व्हेंचर्स बी २०२ येथे कार्यालय आहे. २२ एप्रिल ते २ मे २०१९ या कालावधीत करणने फिर्यादी स्वस्ती यांना पुणे विमान तळावर स्पाईस जेट या विमान कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ड्रेस, व्हेरीफिकेशन सर्टिफिकेट, कंन्फरमेशन लेटरच्या नावाखाली वेळोवेळी विनोद नावाच्या व्यक्तीच्या कॅनरा बँकेच्या खात्यात एकूण ४६ हजार २०० रुपयांची फसवणुक केली. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.