चिंचवडमध्ये विळीने स्वत:चा गळा चिरुन ३४ वर्षीय इसमाची आत्महत्या

0
1179

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – राहत्या घरातील भाजी कापण्याच्या धारदार विळीने स्वत:चा गळा चिरुन एका ३४ वर्षीय इसमाचे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि.१५) पहाटे चारच्या सुमारास चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये घडली.

दत्तात्रय शिवाजी पाचकवडे (वय ३४, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे विळीने गळा कापून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास दत्तात्रय पाचकवडे हे त्यांच्या बिजलीनगर येथील घरी होते. त्यांची पत्नी गाड झोपेत होती. यावेळी पाचवडे यांनी घरातील भाजी कापण्याच्या धारदार विळीने स्वत: चा गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.