Chinchwad

चिंचवडमध्ये रागाने बघण्याच्या कारणावरून तरुणाला दांडक्याने मारहाण

By PCB Author

November 11, 2018

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – रागाने बघत असल्याच्या गैरसमजुतीतून झालेल्या भांडणात चार जणांनी तरुणाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ५) रात्री पावणेबाराच्या सुमारास डांगे चौक येथे घडली.

केदार विष्णू अधिकारी (वय ३०, रा. थेरगाव) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल कांबळे यांच्यासह अन्य तिघांवर (नाव पत्ता माहिती नाही) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार याचे डांगे चौकात चायनीज पदार्थ विक्रीचे दुकान आहे. तो सोमवारी डांगे चौक येथील राहुल हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी कांबळे आणि त्याची एकमेकांकडे रागाने बघत असल्याच्या कारणावरुन भांडणे झाली. कांबळेने तीन साथीदारांच्या मदतीने केदार यांच्या चायनीजच्या दुकानावर जाऊन त्याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.