चिंचवडमध्ये माहेरहून तीन लाख रुपये आणावेत म्हणून पतीकडून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल

0
445

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – क्रेडिट कार्डचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत म्हणून पतीने पत्नीचा शारिरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २०१० ते १५ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान संभाजीनगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी ३४ वर्षीय पत्नीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, देविदास मारुती मासाळकर (वय ३९, रा. संभाजीनगर, चिंचवड) या तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देविदास याचे विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे तो त्याच्या पत्नीचा छळ करत होता. या दरम्यानच्या काळात आरोपीने क्रेडिट कार्डवर लाखो रुपयांचे कर्जही  घेतले होते. त्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्याने पत्नीकडे माहेरहून तीन लाख रुपये आणावेत म्हणून तगादा लावला होता. यावर पत्नीने पैसे आणण्यास नकार दिला असता आरोपीने ‘स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करीन आणि तुम्हाला कामाला लावीन’, अशी धमकी दिली. याप्रकरणी आरोपी पती विरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.